Home Breaking News महिलेला सऊदीमध्ये नौकरीचे आमिष देऊन बनविले बंधक, आपच्या मदतीने सकुशल परतली

महिलेला सऊदीमध्ये नौकरीचे आमिष देऊन बनविले बंधक, आपच्या मदतीने सकुशल परतली

114 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल – लिंबॉर्णी नगर, मेकोसाबाग, नागपूरच्या रहिवासी किरण प्रदीप मानमोठे आँगस्ट २०१६ मध्ये घरगुती कामाकरिता दलालाच्या माध्यमातून दोन वर्षाच्या अनुबंध करार अंतर्गत सऊदी अरेबियाला गेल्या होत्या. परंतु दोन वर्षाच्या करार अवधी नंतर त्यांना बंधक बनविण्यात आले़ यातना देखील देण्यात आल्या. किरण प्रदीप मानमोठे यांनी कशी-बशी आपल्या परिवाराशी संपर्क साधले व त्यांच्या परिस्थिबद्दल सांगितले. परिवारानी आम आदमी पार्टी मध्य नागपुर संघटन मंत्री प्रभात अग्रवाल यांच्याशी संपर्क केला़ त्यानंतर आम आदमी पार्टीने विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. विदेश मंत्रालयाच्या मदतीने किरण प्रदीप मानमोठे यांना देशात सुरक्षित आणण्यात आले. किरण प्रदीप मानमोठे या दोन वर्षाच्या करारानंतर तीन वर्ष असे एकूण पाच वर्ष अल-जौफ सऊदी अरेबिया येथे बंधक होत्या. या अभियानाकरिता प्रभात अग्रवाल यांनी पुढाकार घेतला व किरण प्रदीप मानमोठे यांना देशात आणण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. १५ दिवसांच्या कॉरंटाइननंतर किरण प्रदीप मानमोठे त्यांच्या नागपुरस्थित निवासी परत पोहोचल्या. यावेळी किरण प्रदीप मानमोठे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले़ या कार्यक्रमाला आम आदमी पार्टी नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले व नीलेश गोयल, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, उत्तर नागपुर समन्वयक रोशन डोंगरे, नागपुर युवा अध्यक्ष गिरीश तितरमारे, नागपुर सहसचिव मयंक यादव, हरीश गुरबानी, अलका पोपटकर, विलसन लियोनार्ड, प्रदीप पौनिकर, विश्वजीत मसराम, शुभम सेन, धीरज शर्मा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तित होते.