Home Breaking News पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या हस्ते कोरोनायोद्धा पोलीस पाटिल यांचा सत्कार

पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या हस्ते कोरोनायोद्धा पोलीस पाटिल यांचा सत्कार

159 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल – तालुक्यात कोरोना काळात आपल्या जिवाची कोणत्या ही प्रकारची पर्वा न करता कोरोना पाँझीटीव्ह रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून उत्कृष्ट कार्य करणाºया अशा पोलिस १० पोलीस पाटलांचे कोरोना योद्धा म्हणून गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते पोलीस स्टेशन आमगावच्या सभागृहात पोलीस पाटील यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले़ यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, आमगावचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सालेकसाचे पोलिस निरीक्षक प्रमोद बघेले, गोरेगावचे पोलिस निरीक्षक दीपक वंजारी हे उपस्थित होते़ तसेच सत्कारमूर्ती म्हणून आमगावचे पोलीस पाटील सौ. नर्मदा चुटे, दहेगावचे पोलीस पाटील सौ खेमेश्वरी बोळणे, फुक्कीमेटाचे देवेश्वरी पारधी, बनगावचे पोलिस पाटिल संजय हत्तीमारे, रिसामाचे पोलिस पाटिल लोकचंद भांडारकर,पाउलदौनाचे पोलिस पाटिल राजेश बन्सोड,किडंगिपारचे पोलिस पाटिल देवेंद्र भांडारकर, डोंगरगावचे पोलीस पाटील प्रेमलाल टेंभरे, मानेगावचे पोलिस पाटील संजय पुंड, बोरकन्हारचे पोलीस पाटिल तिलक कटरे हे होते ़ यावेळी पोलिस उपनिरीक्षक विजय रहांगडाले, प्रतिभा पठाडे,तसेच पोलीस अधिकारी,कर्मचारी व पोलिस पाटिल उपस्थित होते़