घराबाहेर असलेल्या चारचाकी वाहनांना अज्ञातांनी लावली आग, मध्यरात्रीची घटना

245
Crashed car burning at night.

विदर्भ वतन न्युज पोर्टल – राज्यातील इतर मोठ्या महानगरामध्ये रात्रीच्या सुमारास वाहनांना आग लावून जाळण्याच्या घटना वारंवार वाढत चालेलल्या आहे़ अज्ञातांनी गोंदियातील श्रीनगर भाग परिसरात वाहनांना आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. गोंदिया शहरातील श्रीनगर परिसरात काही अज्ञातांनी दोन ते तीन चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत. यामुळे वाहनमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री या वाहनांना आग लावण्यात आली वाहनाचे टायर जळून फुटल्याने आवाज होताच परिसरातील लोकांना या घटनेची माहिती झाली. सध्या पोलीस या प्रकरणातील अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. श्रीनगर परिसरात असलेल्या नागरी वस्तीत काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेली चारचाकी वाहनं जाळले. यात एका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांचाही वाहनाचा समावेश असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अज्ञात आरोपी विरुद्ध गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोदविण्यात आला असून आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.