
विदर्भ वतन न्युज पोर्टल – गोंदिया कोहमारा रोडवरील खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणाºया ३ विद्यार्थ्यांचा शाळेत येत असताना इंडिया कारने जोरदार धडक दिली़ यामध्ये २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्य झाला, तर १ विद्यार्थाचा उपचारादरम्यान गोंदिया येथील खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला़ यामध्ये तुषार ब्रिजलाल शिवनकर मु.मुरदोली, (११ वी कला),शुभम नंदकुमार भिमटे मुंढरीटोला (११ वी विज्ञान) व प्रविण संतोष कटरे डव्वा(११ वी विज्ञान) यांचा समावेश आहे. सदर विद्यार्थी हे खजरीकडे दुचाकीने एकत्रित पणे तिन्ही विद्यार्थी आपल्या शाळेत जात होते तर टाटा इंडीका कार ही गोंदियाकडे भरधाव वेगाने जात असताना ही घटना झाली़ या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ पुढील तपास पोलिस विभाग करित आहे़

