
विदर्भ वतन न्युज पोर्टल – गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांचा ११५ व्या जयंतीनिमित्त्य भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील १९ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि खा़ प्रफुल पटेल यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन गोंदियात सत्कार करण्यात आला़ कोश्यारी यांनी आपल्या भाषणातून बोलताना स्व़ मनोहरभाई पटेल प्रमाणेच मी देखील शेकडो शाळा उघडल्या. मात्र आपल्या शाळांना वडिलांचे नाव दिले नाही असा टोला या दरम्यान प्रफुल पटेलांना लगावला़
स्व़ मनोहरभाई पटेल हे स्वत: अशिक्षित असताना त्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकाच दिवशी २२ शाळा उघडल्या त्या नंतर दोन्ही जिल्ह्यात शेकडो शाळा महाविद्याल उघडले असल्याने गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता इतर ठिकाणी जावे लागत नाही. यावेळी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला़या कार्यक्रमात सत्कार करण्यात आलेल्या लोकांमध्ये १९ पैकी १६ मुली आहेत़ आज शिक्षणात मुलींनी प्रगती केली असून मुलांनी मुलींकडून शिकण्याची गरज असल्याचे कोश्यारी म्हणाले. तर प्रफुल पटेल हे पण प्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानमंत्रावर चालत असून त्यांनी गोंदिया भंडारा जिल्यात ‘सबका साथ सबका विकास’ साधले असल्याचे कोश्यारी म्हणाले. तर प्रफुल पटेलांनी देखील मनोहरभाई पटेल यांच्या विषयी उपस्थितांना माहिती दिली व आठवणींना उजाळा दिला़

