ग्रंथालय कर्मचा-यांच्या मागण्या मान्य करा. -शिष्टमंडळाची अजित पवार व अर्थमंत्र्यांना मागणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6938*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

323

विदर्भ वतन,नागपूर-प्रतिनिधी : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अर्थमंत्री यांना भेटून चर्चा केली व आपल्या मागण्यांचे नुकतेच निवेदन देण्यात आले. त्यांनी सकारात्मक उत्तर देवून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. या निवेदनामध्ये थकीत अनुदान मंजूर करणे व दरवर्षी ३० टक्के अनुदान द्यावे. निवेदनात १५० टक्के वाढ देण्यात यावी. कर्मचा-यांना दरमहा वेतन व खात्यात जमा, कर्मचा-यांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती व किमान वेतन ( समान काम व समान वेतन) ग्रंथालयास दजार्वाढ व नवीन वाचनालयास मान्यता. ईत्यादी मागण्या निवेदनात केलेल्या आहेत. यावेळी खासदार प्रफ्फुल पटेल यांच्याशी मागण्या संदर्भात चर्चा केली तर त्यांनीही आपल्या मागण्या मार्गी लावू असे मान्य केले. यावेळी बजरंगसिंह परिहार, अनिल अहिरकर, दीनानाथ पडोळे, दुनेश्वर पेठे यावेळी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शिष्टमंडळाच्या तर्फे यशस्वीरित्या क्रेंद्रीय अध्यक्ष विजय शिंदे, कार्यवाह शशिकांत नारनवरे, नथ्थु वाहणे व सदस्यगण आणि जागेश्वर शेन्डें, दीपक मेश्राम, राहुल सोमंकुवर, सचिव नागपूर जिल्हा ग्रंथालय. यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.