मध्य प्रदेश सरकारच्या मृगनयनी या नव्याने सुरू करण्यात आलेल्या शोरूमचे केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरात उद्धाटन संपन्न

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6925*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

188

विदर्भ वतन, नागपूर-प्रतिनिधी : मध्य प्रदेश सरकारच्या मृगनयनी या नव्याने सुरू करण्यात आलेल्या शोरूमचे रविवारी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. सिव्हील लाईन्स स्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र परिसरात मृगनयनीचे शोरूम सुरू करण्यात आले आहे.
नितीन गडकरी यांनी यावेळी शोरूमची पाहणी केली. अधिका-यांशी चर्चा करताना ते म्हणाले, हातमाग, हस्तकलेच्या वस्तूंचा देशातच नाही तर विदेशातही मोठी मागणी आहे. केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत अशा हातमाग व हस्तकलेच्या वस्तूना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे खादी ग्रामोद्योग, हातमाग मंडळ यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी भोपाळच्या संत रविदास मध्य प्रदेश हस्तशिल्प व हातमाग विकास मंडळाचे आयुक्त राजीव शर्मा यांच्यासह उपसंचालक संजय श्रीवास्तव, सरव्यवस्थापक महेश गुलाटी, मिलिंद मेंढी, विश्वनाथ धकाते यांची उपस्थिती होती.