इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट नागपूर चॅप्टरच्या नवीन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6913*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

139

विदर्भ वतन,नागपूर-प्रतिनिधी : इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट नागपूरच्या वतीने नुकताच कार्यक्रम संपन्न झाला असून महापौर दयाशंकर तिवारी यांची उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अध्यक्ष डॉ. विजय फाटे, सचिव युगल रायलू , कोषाध्यक्ष राजेंद्र खेरडे इतर पदाधिका?्यां चे अभिनंदन केले. आणि महापौरांनी तरुण पिढीला सक्षम बनविण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन केले. त्याप्रसंगी म्हणाले की नवीन पिढीला कौशल्य आणि प्रशिक्षणासह शिकवणे देखील अति आवश्यक आहे. तसेच मनपाच्या शाळेत शिकणा?्या विद्यार्थ्यांना ते विशेष प्रशिक्षण देऊन अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमात पाठविणार आहे. याप्रसंगी सभागृहात उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा गजर करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवानिवृत्त अध्यक्ष संतोष कुमार यांनी नवीन अध्यक्ष डॉ. विजय फाटे यांची निवड केली. त्यानंतर डॉ. विजय फाटे यांनी इतर पराधिकारी यांचीही नेमणूक केली. नवनियुक्त सचिव डॉ. युगल रायलू यांनी नवीन टीम यांच्या कामात पूर्ण सहकार्य करेल.
असे आश्वासन मा.महापौरांना दिल. तसेच म्हणाले नागपूर शहरातील प्रत्येक क्षेत्रात (आयएसटीडी) प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत. असेही ते म्हणाले. डॉ.विजय फाटेंनी महापौरांचे आभार मानले. नविनवर्षाच्या योजनां विषयी माहिती दिली. विशेषता: शिक्षण, उद्योग आणि सामाजिक या तिन्ही क्षेत्रात काम करणार आहे. व त्यांची टीम इतर संस्थांसोबत नागपुरात सर्वत्र प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी काम करू शकते असे म्हटले. साईश्री खेरडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर राजेंद्र कोरडे यांनी आभार मानले. कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी डॉ. प्रणाली लुटे आणि सुरेंद्र गेडाम यांनी परिश्रम घेतले.