Home महाराष्ट्र प्रेम……..एक अनन्यसाधारण भावना

प्रेम……..एक अनन्यसाधारण भावना

0
प्रेम……..एक अनन्यसाधारण भावना

पृथ्वीवर जीवसृष्टिच्या उत्पत्तिबरोबरच विविध भावभावनसुद्धा उत्पन्न झाल्या. चांगल्या आणि वाईट असे भावनांचे वर्गीकरण आपसुकच झाले. जगराहाटित सर्व भावनांचे प्रकटीकरण ओघाने होत राहिले. इतर जीवितांच्या तुलनेत बुद्धिमान समजल्या जाणा-या मानवाला सगळ्यात जास्त मार्गनी आपल्या भावना व्यक्त करण्याचे सौभाग्य लाभले. सर्व भावनांमध्ये निरागस आणि सूंदर मानली गेलेली भावना म्हणजे… प्रेम. प्रेमाला सामाजिक जीवनाचा पाया म्हटले तर ते वावणे ठरणार नाही.
जगभरातील पुराण ग्रंथ,नाटक, गाणे, कविता ,चित्रपट,मालिका इत्यादिमधुन वास्तव वा काल्पनिक प्रेमकथा वर्णित केलेल्या आढळतात. संत-महात्मा,पीर-फकीर आणि धर्म संस्थापकांनी वेळोवेळी प्रेम व मनावतेचीच शिकवण दिली. विविध मतप्रवाहांमुळे, मतभेदांमुळे,गैरसमजांमुळे प्रेमभावनेशी निगडित घटकांना बरे-वाईट अनुभव आले. तिस-या शतकातिल रोमन संत वैलेनटाइन यांनी दिलेल्या प्रेमाच्या संदेशाने जगावर गारुड केले. 14 फेब्रूवारी हा त्यांचा मृत्युदिन जगभरात वैलेंटाइन डे अर्थात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. लैला-मजनू, हीर-रांझा, शीरी-फरहात, इत्यादि प्रचलित प्रेमकथा जगात गाजल्या. पण, या प्रेमकथांव्यतिरिक्त त्या परिघाला छेद देणा-या प्रेमकथा अस्तित्वात आहेत काय? याचे उत्तर आहे, होय! चला तर मग त्यांबद्दल जाणून घेऊया.
पहिली कथा आहे निजामुद्दीन औलिया आणि त्यांचे शिष्य अमीर खुसरो यांची. तेराव्या शतकात फारसी वडील आणि राजपूत आईच्या पोटी जन्मलेले अमीर खुसरो, बालपणापासुनच इतरांपेक्षा वेगळ्या विचारांचे होते. त्यांचे वडील आणि मातुळ आजोबा चिश्ती पंथाचे चौथे पीर असलेल्या निजामुद्दीन औलियांचे भक्त होते. खुसरोंच्या संपूर्ण परिवाराने औलियांकडून धर्मदीक्षा घेतली होती.सात वर्षांच्या वयात पित्याचे छत्र हरवलेले खुसरो अवघ्या विशित प्रख्यात शायर बनले. अरबी, फारसी आणि संस्कृतचे जाणकर असलेले सूफी शायर अमीर खुसरो कव्वालीचे जनक मानले जातात. गझल या संगीतप्रकाराची ओळख भारतीय उपखंडाला त्यांनीच करुन दिली. निजामुद्दीन अवलियांबद्दल खुसरोंच्या मनात अतीव प्रेम होते. त्यांच्या रचनांमधून ते आपले प्रेम व्यक्त करायचे. अमीर खुसरोंच्या रचनांचा आत्मा निजामुद्दीन अवलिया होते हे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
निजामुद्दीन अवलियांच्या मृत्युबद्दल एक दंतकथा ऐकिवत आहे. अवलियांना जेव्हा त्यंच्या मृत्युची चहूल लागली, तेव्हा त्यांनी अमीर खुसरो यांना एका कामाचे निमित्त सांगून दिल्ली बाहेर पाठवीले. खुसरो आपल्या पिरची मृत्यु सहन करु शकणार नाही हे अवलियांना ठाऊक होते. खुसरो दिल्लीबाहेर गेल्यावर एक दरवेश अर्थात भिक्षुक अवलियांकडे आला. भिक्षुकाला देण्याकरिता त्यांच्याकडे काहीही नव्हते म्हणून अवलियांनी भिक्षुकाला आपल्या वाहाणा देऊन टाकल्या. तो भिक्षुक अमीर खुसरोना परतीच्या प्रवासात आढळला. आपल्या पिरच्या वाहाणा त्यांनी अचूक ओळखल्या. भिक्षुकाला अपल्याकडील सर्व धन देऊन त्याबदल्यात पिरच्या वाहाणा हस्तगत केल्या. त्याक्षणि खुसरोंचे वाक्य होते, या वाहाणांची जागा तुमच्या पायात नाही, तर माज्या डोक्यावर आहे.” तत्क्षणि खुसरो निजामुद्दीन अवलियांकडे निघाले. तोपर्यंत पीरची इहलोकाची यात्रा समाप्त झालेली होती. दु:खी अंतकरणान खुसरो म्हणाले
“गोरी सेवे सेज पर मुख पर डारे केस।
चल खुसरो घर आपने रैन भई चहुँ देस….. ”
गुरु विरहाच्या दु:खात अवघ्या सहा महिन्यात खुसरोनी शरीर त्यागुन निघुन गेले. आजही दिल्ली स्थित निजामुद्दीन दरगाह येथे निजामुद्दीन अवलिया आणि अमीर खुसरो या दोघांच्या मजारचे दर्शन घेतल्याशिवाय दर्शन पूर्ण मानले जात नाही.
दुसरी प्रेमकहाणी आहे हेलन केलर आणि त्यांची गुरु एनी सुलिव्हॅन यांची. आयरिश कुटुंबातल्या एनी सुलिव्हॅन बलपणीच अनाथ झाल्या. 1887 मध्ये त्या हेलन केलर यांच्या शिक्षिका म्हणून केलर कुटुंबियांच्या घरी आल्या. अंधत्व, मुकेपणा आणि बधिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाने ग्रासलेल्या हेलन केलर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्णकेले.कला पदवी मिळविणा?्या त्या पहिल्या बहिरा-अंध व्यक्ती होत्या.उत्तम पत्रकार,वक्ता,
प्रबोधनकार सारख्या भूमिका हेलन केलर वठऊ शकल्या त्यात सुलिव्हॅन बाईंचे मोलाचे योगदान. गुरु शिष्येचा हा सहवास 49 वर्षे म्हणजेच सुलिव्हॅन यांच्या निधनापर्यंत राहिला. सुलिव्हॅन बाई शेवटच्या घटका सुरु असतांना कुणीतरी म्हणालं,””बाई, लवकर ब?्या व्हा. तुमच्याशिवय हेलन केलर ह्या नावाला अर्थच उरणार नाही.”’तेव्हा मृत्युच्या छायेत असलेल्या सुलिव्हॅन बाई म्हणाल्या ,”” तसं झालं तर मी अपयशी ठरेन.” अर्थातच हेलन केलर ह्यांनी आपल्या बाईना अपयशि ठरू दिलं नाही. गुरु मृत्युनंतर 32 वर्षे म्हणजे वयाच्या 88 व्या वर्षी मृत्युपर्यंत हेलन केलर यांनी खुप समाज कार्य केले. महायुद्धात जायबंदी होऊन अपंगत्व झालेल्या सैनिकांचे युद्ध भूमित जाऊन मनोधैर्य वाढविण्याचे मोलाचे कार्य केलर यांनी केले.त्यांचा 27 जूनचा वाढदिवस पेनसिल्व्हेनियामध्ये
हेलन केलर डे म्हणून साजरा केला जातो आणि, त्यांच्या जन्माच्या शताब्दी वर्षात, अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या अध्यक्षीय घोषणेद्वारे त्या ओळखल्या गेल्या .
या आणि अशा कितीतरी प्रेमकथा अस्तित्वात आहेत. जंससामान्यांना प्रेरक आणि प्रेमाच्या त्याच त्या परिभाषेला छेद देणा?्या या प्रेमकथा ठरतात. सर्वांग सूंदर असे हे प्रेम खरोखरिच मन मोहरुन टाकतं.

-स्वप्ना अनिल वानखडे
वर्धा (संवाद :७३७८८९२५८४)