Home गोंदिया धारगाव येथे राष्ट्रपिता फुले अभ्यासिका

धारगाव येथे राष्ट्रपिता फुले अभ्यासिका

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6899*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

127 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भंडारा-प्रतिनिधी : धारगाव येथे दि. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी मा. प्रशांत रोकडे सर,कफर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली राष्ट्रपिता फुले अभ्यासिकेचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून असिस्टंट डायरेक्टर विकास गडपायले तर अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे समाज कल्याण विभाग उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भंडाराचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त नयन कांबळे, शिरीष फुलझेले, अविनाश कोटांगले, दिपक वानखेडे, तरुणा पाटील, संजय बांगर, तेजस मेश्राम, अतुल इंगोले, विशाल रोकडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कमी वयात जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट पार करणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुरज आडे, कविदास काथमोडे, परमेश आडे, मनिषा धुर्वे यांचे सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जगदीश डवरे, निखिल कोचे,ग्राम विकास अधिकारी आणि गावातील नागरिक यांनी केले आहे.