Home नागपूर जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी परिपूर्ण दस्तऐवजासह आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी परिपूर्ण दस्तऐवजासह आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी परिपूर्ण दस्तऐवजासह आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर-प्रतिनिधी : सन 2020-21 करिता शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी व निवडणूक, इतर कारणाकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज आॅनलाईन स्वरुपात 10 आॅगस्ट, 2020 पासून स्वीकारण्यात येत असून, अर्जनिहाय सेवा शुल्क आॅनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील.12 डिसेंबर, 2020 पासून अर्जदार यांच्या सोयीकरिता उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
आॅनलाईन अर्ज प्रक्रिया व आॅनलाईन सेवा शुल्क भरल्यानंतर संबंधित अर्जदार यांनी अर्ज दस्ताऐवजासह समितीस सादर करणे अनिवार्य आहे. अनेक अर्जदार यांनी मूळ दस्ताऐवज व मूळ प्रतिज्ञापत्रे अद्याप सादर केलेले नाही तसेच ब-याच अर्जदारांनी विलंबाने सादर केल्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेस विलंब होत आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणारे/ लाभ घेऊ इच्छिणारे अर्जदार यांनी कृपया अर्जासोबत आॅनलाईन प्रक्रियेवेळी सादर केलेले दस्तऐवज व मूळ प्रतिज्ञापत्र (वंशावळ सत्यता प्रमाणपत्र) यासह संबंधित समिती यांचे समक्ष सादर करावे, असे आवाहन बाटीर्चे महासंचालक तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.