राज्यासह देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली -एमपीआयचा धक्कादायक अहवाल

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6882*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

244

विदर्भ वतन न्यूज पोर्टल(वृत्तसंस्था) : देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरिबी, उपासमार आणि असमानता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा अहवाल जागतिक बहुआयामी दारिद्रय निर्देशांंक एमपीआयने दिला आहे. तसेच, निती आयोगाच्या 2019 च्या शाश्वत विकास ध्येय अहवालानुसार गरिबी, उपासमार आणि आर्थिक असमानता अधिक व्यापक असून यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असं म्हटलं आहे.
भारतात ३६.४ कोटी एमपीआय गरीब आहेत, ज्यात १५.६ कोटी (३४.६ टक्के) मुलं आहेत. भारतातील जवळपास २७.१ टक्के गरिबांना आपला दहावा जन्मदिवसही पाहायला मिळत नाही. यापूर्वीच या मुलांचा मृत्यू होतो. 2019-20 आणि 2015-16 या दोन्हीं वर्षांतील आकडेवारीत काहीच तफावत नसल्याचे समोर आले आहे.
निती आयोगाने जाहीर केलेल्या आधार रेषा अहवालानुसार २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात गरिबी वाढली आहे. गरिबी वाढलेल्या राज्यांमध्ये बिहार, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, पंजाब आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्येच फक्त गरिबी कमी झाली आहे. मेघालय, हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रातील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.