
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर-प्रतिनिधी : हळदी कुंकू समारंभ हा फक्त सौभाग्यवती स्त्री यांचा समारंभ नव्हे तर सर्व महिलांना एकत्रित आणणारा दुवा आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला सेवा मंडळातर्फे हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता आणि एक पत्रिका छापली होती. त्या पत्रिकेत सर्व जाती धर्माच्या पंथाच्या स्त्रिया आपल्या लेकीसुनांसह कार्यक्रमाला येतील आणि एकाच जाजमावर बसतील असा उल्लेख होता.. आज स्त्री विधवा असो वा परित्यक्ता वा कुमारी सर्वांना समान वागणूक स्त्रियांनीच देण्याची गरज आहे.. भगिनी भाव जोपासायला पाहिजे. जिजाऊ, सावित्री आणि रमाई या तीनही त्यागमूर्तींचे कार्य आम्हा महिलांना अतिशय प्रेरणादायी आहे यात शंका नाही.. या स्त्रियांनी केवळ अंधश्रद्ध भावनेने व्यवहार केला नाही तर आपली बुद्धी वापरून काम केले..त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन कार्य करायला पाहिजे…. प्रेम भाऊ झाडे मित्र परिवार वाडी यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभ आणि महिला प्रबोधन या कार्यक्रमात डॉ. लीना निकम आपले विचार मांडत होत्या..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंदा राऊत होत्या. त्यांनी महिलांना अत्याचाराविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले..
सौ. सुनीता गावंडे यांनी राजकारणात महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले.. यावेळी कोरोना काळात लोकांना मदत करणा-या महिलांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन … यांनी तर आभार प्रदर्शन आयोजिका प्रज्ञा प्रेम झाडे यांनी केले.

