Home नागपूर १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा महाविद्यालयात मातृ-पितृ दिवस म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्या -हिंदुत्वनिष्ठ संघटनांद्वारे शासनाला निवेदन सादर

१४ फेब्रुवारी हा दिवस शाळा महाविद्यालयात मातृ-पितृ दिवस म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्या -हिंदुत्वनिष्ठ संघटनांद्वारे शासनाला निवेदन सादर

0
१४ फेब्रुवारी हा दिवस शाळा महाविद्यालयात मातृ-पितृ दिवस म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्या -हिंदुत्वनिष्ठ संघटनांद्वारे शासनाला निवेदन सादर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर-प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात १४ फेबृवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे. पाश्चात्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या कुप्रथेचा भारतात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून युवा पिढी अनैतिकतेच्या गर्तेत ओढली जात आहे. व्हॅलेंटाईन डे या प्रथेचा भारत देश, भारतीय परंपरा यांच्याशी काडीचाही संबंध नसताना आपण हा डे साजरा करण्याचे काही एक कारण नाही. एकीकडे वर्षभर विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात अश्लीलता आणि स्वैराचार यांचा भडीमार युवकांच्या मनावर होत असतो. या दिवशी तर प्रेमाच्या गोंडस नावाखाली अश्लीलता, बीभत्सपणा, याचे प्रदर्शनच सार्वजनिक ठिकाणी दिसून येतं. या दिवशी युवक युवतींमध्ये मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदि अपप्रकारांत वाढ झालेली दिसून येते. या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. काही वेळा कायदा सुव्यवस्थेचादेखील प्रश्न निर्माण होत असतो.
या बाबींकडे बघता शासनाने अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणा-या समाजकंटकांवर कठोर करवाई करावी. तसेच महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक घेऊन निर्देश द्यावेत. अश्या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समिती, करणी सेना व उपस्थित हिंदुत्वानिष्ठान्द्वारे मा. उपजिल्हाधिकारी वीरेंद्र खजान्जी यांचे कार्यालयाद्वारे शासनाला करण्यात आली.
सोबतच युवा पिढीसमोर आदर्श पर्याय निर्माण होण्यासाठी १४ फेबृवारी या दिवशी मातृ-पितृ दिवस काही संघटनांद्वारे साजरा केला जातो. पाश्चात्यांच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या जेष्ठ नागरिकांविषयीच्या सामाजिक समस्येविषयी सरकारही चिंतेत असून त्यादृष्टीने प्रबोधन करत असते. मातृ-पितृ दिवस या उपक्रमाद्वारे माता पित्यांना सन्मान देण्याची भावना युवपिढीत वाढीस लागणार आहे. यासाठी शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये निवेदन देऊन याविषयी जागृती केली जात आहे. म्हणून मातृ-पितृ दिवस साजरा करून त्यास प्रोत्साहन द्यावे अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अतुल अर्वेनला, अभिजीत पोलके, करणी सेनेचे विश्वजीत सिंह बैस, शौनक देशमुख, श्रेयस दाते, जयसिंह बैस, इशांत कनोजिया तसेच अधिवक्ता चिंतामणी देशपांडे हे उपस्थित होते.