लाखांदूरचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात -ट्रॅक्टर मालकाकडून 10 हजार मागीतली लाच

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6858*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

223

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,लाखांदू-प्रतिनिधी : येथील तहसीलदार निवृत्ती जगन उईके यांनी ट्रॅक्टर मालकाकडून दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांचे विरुद्ध अँटी करप्शन ब्युरो पथकाने कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे बोथली ता. लाखांदूर येथील रहिवासी असून ते रेतीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर आहेत. सध्या रेतीघाट बंद असल्याने गावातील घरकुल करीता नदीपात्रातून रेती उपसा करून ते ट्रॅक्टरने पुरवतात. 2 फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांचा चालक ट्रॅक्टर घेऊन धमार्पुरी गावाजवळील चुलबंद नदी पात्रातील रेती आणण्यासाठी जात असताना तहसीलदार निवृत्ती जगन उईके यांनी त्यांचा ट्रॅक्टर अडविला व पोलीस स्टेशन दिघोरी येथे घेऊन जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
तक्रारदार 5 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय येथे तहसीलदार उईके यांना भेटले असता त्यांनी तक्रार तक्रारदारास यापुढे त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता याप्रमाणे लाचेची मागणी केली. तहसीलदार उईके यांनी मागणी केलेली लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथील कार्यालयात तहसीलदार यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडाराचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा रचून कारवाई केली. पडताळणी दरम्यान आरोपी तहसीलदार निवृत्ती जगन उईके यांनी तक्रारदाराच्या रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर वर यापुढे कोणतीही कारवाई न करण्यासाठी दरमहा दहा हजार रुपये लाच रकमेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन लाखांदूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर राजेश दुद्दलवार, अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर मिलिंद तोतरे, लाप्रवी भंडाराचे पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी , पोलीस नायक कोमल बनकर, सुनील भोकरे, दिनेश धार्मिक, राजेंद्र कुरुदकर सर्व लाप्रवि भंडारा यांनी केली.