स्केल प्रकल्पअंतर्गत शिक्षक प्रशिक्षण

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6852*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

229

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-भंडारा : खेळातून शिक्षण व जीवन कौशल्य विकास साधला जावा म्हणून मॅजिक बस इंडिया फाउंडेशनतर्फे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले.
मागील पाच वषार्पासून ही संस्था भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून भंडारा तालुक्यात मागील आठ महिन्यांपासून 6 वी ते 9 वीच्या मुलांसोबत काम करत आहे. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी व्हावे तसेच मुलांमध्ये जीवन जगण्याचे कौशल्य विकसित व्हावे या उद्देशांना घेऊन संस्था शाळांसोबत काम करत आहे. खेळाच्या माध्यमातून जीवन कौशल्य विकसित व्हावे यासाठी काळात कोविडचे सर्व नियमांचे पालन करुन गावा गावात जाऊन संस्थेच्या शाळा सहाय्यक अधिकारी यांनी सत्र राबवून कोविड विषयक जनजागृती करीत आहे.
दि.02 फेब्रु. ते 05 फेब्रु. दरम्यान भंडारा तालुक्यातील 6 वी ते 9 वीच्या वगार्तील प्रत्येक शाळेतून 2 शिक्षक याप्रमाणे तालुक्यातील एकूण 177 शिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले.
यात भंडारा तालुक्यातील एकूण 11 केंद्रातील शिक्षक सहभागी होते. या 4 दिवसीय प्रशिक्षणात खेळातून शिक्षण- जीवन कौशल्य विकास याचे प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील करण्यात आले. सदर प्रशिक्षण कोविड 19 चे पालन करूनच घेण्यात आले. सुरक्षित अंतर पाळले जावे या दृष्टीने एकूण 5 केंद्रांवर प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच चारही दिवस नियमित मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या टीम कडून थमार्मीटर व आॅक्सीमीटर ने तपासणी करून तसेच हातांना सॅनीटायझर लावूनच प्रशिक्षण केंद्रात प्रवेश दिला जात होता.
खेळाच्या माध्यमातून मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा या दृष्टीने जीवन कौशल्यविकास सत्र शाळेत राबविण्यासाठी 4 दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. १) प्रत्येक मुला-मुलींनी आपले शिक्षण पूर्ण करावे. २)मुलांनी स्वत:च्या उपजीविकेचे साधन स्वत: निर्माण करणे. या उद्देशांवर स्केल प्रकल्प अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण घेण्यात आले. यात चैतन्य हायस्कुल
येथे मानेगाव बाजार,पहेला, डावडीपार बाजार,वाकेश्वर या केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या व्हावे यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत पाचही प्रशिक्षण केंद्रांवर सनियंत्रण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. समारोपीय कार्यक्रमात केंद्र प्रमुख प्रमोदकुमार अणेराव सर यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी स्केल प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निकी प्रेमानंद, प्रशिक्षक मंगेश कांबळे, तालुका व्यवस्थापक विशाल कुंभकर्ण तसेच शाळा सहाय्यक अधिकारी वी.वी.हटवार मॅडम ररड निशा शामकुवर, ललित पानतावणे व समुदाय करिश्मा अनामिका मने व करिश्मा थोटे समन्वयक आदि उपस्थित होते.