Home नागपूर कला वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह

कला वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह

0
कला वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-करडी-भंडारा : कला वाणिज्य करडीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रासेयो मार्फत “३२ वे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२१” पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अधयक्षस्थानी करडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता जी. अंबादे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील नेवसे होते. प्रमुख पाहुणे नेवसे सर यांनी मुलांना रस्ता सुरक्षाबद्दल माहिती दिली. यामध्ये त्यांनी रस्ता अपघात, झेब्रा क्रसिंग,गाडी चालवताना घ्यावयाची काळजी याबद्दल विद्याथ्यार्ना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला करडी पोलीस स्टेशनचे गौतम सर, साठवणे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेंडे सर तर आभार प्रदर्शन प्रा. वाडिभिस्मे सर यांनी केले. कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. हर्षल शेंडे, प्रा. बोंद्रे सर, प्रा. धार्मिक सर प्रा. वंजारी सर प्रामुख्याने उपस्थित होते.