केश शिल्प मंडळ” पुनजीर्वित करण्याची मागणी…

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6833*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

233

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : महाराष्ट्र शासनाने मागील काळात सलून व्यवसायिकांच्या कल्याणार्थ निर्माण केलेले “केश शिल्प मंडळ” पुनजीर्वित करावे व त्याच्या नियुक्त्या कराव्यात जेणे करून त्याचा लाभ नाभीक सलून व्यवसायिक बांधवांना व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळचे प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील यांचेकडे केली.
नागपूर येथील नुकत्याच झालेल्या दौ-यात महाराष्ट्र नाभिक महामंडळचे विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर यांचे नेतृत्त्वात नागपूर जिल्हा सरचिटणीस राजेंद्र इंगळे, जिल्हा संघठन सचिव डॉ. नितीन कान्होलकर, प्रसिद्धी प्रमुख महादेव जिचकार यांचे शिष्टमंडळाने राज्याचे मा. उपमुख्यमंत्री, अर्थ व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांची “देवगिरी” या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शिष्टमंडळ व मा. उपमुख्यमंत्री अजितदादांची या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आणि साहेबांनी यावर शक्यतो लवकर निर्णय घेऊ,असे आश्वासन दिले.