दरवाढी विरोधात शिवसेनेचा वाडीत चक्काजाम -केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6803*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

211

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : दि ५फेब्रुवारी.डिझेल, पेट्रोल,व स्वयंपाक गॅसच्या झालेल्या अवाढव्य दरवाढीने त्रस्त झालेल्या सवार्सामान्य जनतेसाठी महामार्ग क्र. ६ वरील एम. आय. डी. सी. वळणावर वाहतूक रोखून शहर शिवसेनेने आक्रमक चक्काजाम केला. शहर प्रमुख मधु माणके-पाटील यांच्या नेतृत्वात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर पाटील, युवासेना जिल्हाधिकारी हर्षल काकडे, दिवाकर पाटने, हिंगणा विधानसभा संघटक संतोष केचे, तालुकाप्रमुख संजय अनासाने, उपतालुकाप्रमुख रुपेश झाडे, हरीशभाई हिरणवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य महामार्ग क्र. ६ वर शिवसैनिकांनी वाहतूक रोखून चक्काजाम केला.” महागाई कमी करा नाही तर खुर्च्या खाली करा” अश्या घोषणा देत पेट्रोल, डीझेल व स्वयंपाक गॅसच्या दरवाढीचा निषेध करीत शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून राग व्यक्त केला. ” मोदी सराकारच्या भुलथापांना चुकुन बळी पडलेल्या सर्वसामान्य जनतेला सरकारच्या कारभाराची आता जाणीव झाली असून सरकार खाली खेचण्याचे काम जनता केल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी केले. केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारुन पुतळा जाळण्याच्या तयारीत असतांना पुतळा जप्त करण्यासाठी शिवसैनीक व पोलिसात झटपट होऊन शेवटी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला. यावेळी मदनसिंग राणा, संतोष केशरवानी, किशोर ढगे, विनोद सातींगे,अमोल कुरडकर, दामोधर जीध, प्रमोद जाधव,भाऊराव रेवतकर ,अखिलेश सिंग, राकेश अग्रवाल, विजय मिश्रा, कपिल भल्मे, अखिल पोहनकर, सुभाष माने, सचिन पाटील, संदीप विधळे, रणजीत सोनसरे, ,जेम्स फ्रान्सीस, भोजराज भोंगळे, शिवम राजे, प्रज्वल अतकरी, माणिक निकोसे, गुलशन शेंडे, चेतन बडगे, अजय देशमुख,जगदीश पटले,अंकीत व-हाडकर,नागोराव गोमकर,संतोष हरणे,शैलेश माटुरकर, आदित्य हेंबाडे, हितेश टाकोने, गौरव उगले, आदित्य विलोनकर, अजय चौधरी, संदीप उमरेडकर, रवी अजीत, विशाल लोनकर,पीयूष जीवतोडे,अनिकेत त्रिपाठी, राज देशभ्रतार व मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.