Home Breaking News आमदार राजुभाऊ पारवे यांनी मांडल्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील चिचघाट उपसा सिंचन, मोखेबडी उपसा सिंचनाच्या समस्या

आमदार राजुभाऊ पारवे यांनी मांडल्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील चिचघाट उपसा सिंचन, मोखेबडी उपसा सिंचनाच्या समस्या

0
आमदार राजुभाऊ पारवे यांनी मांडल्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील चिचघाट उपसा सिंचन, मोखेबडी उपसा सिंचनाच्या समस्या
विदर्भ वतन न्युज पोर्टल,उमरेड
मंगळवार ला सिंचन भवन येथे मा. ना. श्री. जयंत पाटील, जलसंपदा लाभक्षेत्र विकास मंत्री,  व तसेच मा. ना. श्री. अनिल देशमुख, याचे सोबत झाल्येला बैठकीत मा. श्री. राजू पारवे, आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र यांनी कुही तालुक्यातील चिचघाट उपसा सिंचन, मोखेबडी उपसा सिंचन या योजने संबंधित प्रकल्प बाधित लोकांना पाणी कसे उपलब्ध होईल. याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आले. त्या मध्ये मोखाबर्डी व आंभोरा उपसा सिंचन योजनेचा मुख्य कालव्यांवर ठिकठिकाणी सबमर्सीबल पंप बसवून विधानसभा क्षेत्रातील गावांचा तलावांचा पुर्नभराव करून वर्षभर पाणी पुरवठा व तलावाखाली अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकतील. व तसेच कुही तालुक्यातील सांवगी गावाजवळ कन्हान नदीच्या उजव्या तिरावर बांधण्याचे प्रस्तावित केलेले असून हा सदर प्रस्ताव महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण यांच्याकडे पाठवलेले असून त्याची लवकरात लवकर मंजूरी देण्यात येईल व हि योजना लवकरच सुरु होईल. अशी ग्वाही जलसंपदा लाभक्षेत्र विकास मंत्री, यांनी दिली.
व त्यावेळी सदर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.