Home नागपूर जनतेच्या खिशाला कैची, हे आम जनतेचे बजेट नसून कापोर्रेट व निवडणूक बजेट होय -सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

जनतेच्या खिशाला कैची, हे आम जनतेचे बजेट नसून कापोर्रेट व निवडणूक बजेट होय -सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

0
जनतेच्या खिशाला कैची, हे आम जनतेचे बजेट नसून कापोर्रेट व निवडणूक बजेट होय -सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : आज देशातील जनतेला आशा होत्या की पेट्रोल डिझेल स्वस्त होईल, ज्यामुळे महागाई कमी होईल, इनकम टैक्स देणा-यांना काही राहत मिळेल, शेतकरी आन्दोलन करीत आहेत, शेतक-यासाठी मोठी तरतूद असेल परन्तु असे काही झाल्याचे दिसून येत नाही.
आजच्या अन्दाजपत्रकात अनेक घोषणा केल्याचे दिसून येते, परन्तु वास्तविक तरतूद केल्याचे कुठेच दिसत नाही, विशेष करून मीडियामध्ये शेतक-यांसाठी मोठी तरतूद केल्याच्या हेडलाइन दाखविन्यात आल्या, परन्तु ऐकून बजेटच्या किती टक्के रक्कम शेती व शेतकरी यांच्यासाठी ठेवली आहे, याचा कुठेही उल्लेख नाही, गहूं, कापूस, धान, दलहन खरेदीकरिता काही रक्कमेंची तरतूद दिसून येते, परन्तु शेतीचा विकास कोणत्या मागार्ने केला जाईल याचा रोडमैप व त्यासाठी कुठलीच तरतूद केल्याचे दिसून येत नाही.
उलट पेट्रोल डिझेल स्वस्त न करता कृषि विकास टैक्स लावण्यात आला आहे. यामुळे महागाई वाढत जाणार हे निश्चित.करदात्यांना सवलत मिळण्याची आशा होती, परन्तु तीही पूर्ण झाली नाही. शिक्षणाशिवाय देशाचा विकास संभव नाही, दर्जेदार व सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाच्या खर्चात भरीव वाढ अपेक्षित होती, परंतु यामध्ये वाढ केल्याचे दिसून येत नाही.
परंतु बंगाल, तमिलनाडु, असम व केरलच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करीत त्या राज्यातील मतदात्याला आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केल्याचे दिसून येते, हे सुद्धा 15 लाखाच्या निवडनूक जुमल्या प्रमाणे होऊ शकते.
विशेष करूनमसूर, चना किंवा इतर शेतमालावर कर लावून सामान्य जनतेच्या खिशाला कैची लावण्यात आली आहे.
देशातील युवकांना रोजगार मिळावेत यासाठी कुठलीही तरतूद नाही, आरोग्यच्या अन्दाजपत्रकात वाढ केली परन्तु तीही पुरेशी नसल्याचे दिसून येते.
एकूणच हे अन्दाजपत्रक गरीब जनतेच्या खिशाला चोट देणारे आहे.