Home नागपूर नायलॉन मांज्या मुळे निष्पाप प्रणयचा बळी

नायलॉन मांज्या मुळे निष्पाप प्रणयचा बळी

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6726*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

168 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नायलॉन मांजाच्या विक्रीस बंदी असून संक्रांतीच्या काळात सर्रासपणे नायलॉन मांजा प्रशासनाच्या गलथन चुकीमुळे विकल्या जातो आणि याची परिणीती म्हणून नागपूर स्थित भावी इंजीनियर प्रणय ठाकरे वय 21 वर्षे यांना आपला भर रस्त्यामध्ये जीव गमवावा लागला.
अशा अतिशय दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नये याकरिता या जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री व त्यावरील बंदी हा एकमेव उपाय असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे सध्याच्या काळात अतिशय आवश्यक आहे.
17 जानेवारी रोजी राष्ट्रवादी डॉक्टर सेल तर्फे मा. पालकमंत्री नितीन राऊत साहेबांना निवेदन पत्र डॉक्टर सेलचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कान्होलकर, सरचिटणीस डॉ. मनोहर ठाकरे, चिटणीस डॉ. संकेत दुबे, डॉ. राहुल राऊत यांनी दिले. सोबतच प्रदेश कॉंग्रेस सचिव गिरीषजी पांडव, प्रदेश अनुसूचित सेल अध्यक्षा प्रतिभा उके, माजी नगर सेविका नयना झाडे, रमेश गिरडकर, प्रकाश चवरे, रमेश बडोदेकर, मुकेश शर्मा, शेषराव नगरारे, नरेश यादव, प्रकाश शिवणकर, प्रदीप गणोरकर, रामभाऊ कावळकर, रवि लांजेवार सर्वांची उपस्थिती होती .
पालकमंत्री साहेबांना विनंती करण्यात आली की या गंभीर प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देऊन संक्रांतीच्या काळात विकल्या जाणा-या नायलॉन मांजा विक्रीच्या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी