महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच तर्फे “वेध…… भविष्याचा ” कार्यक्रम संपन्न

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6622*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

195

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : नाभिक विद्यार्थ्याना भविष्यातील प्रगती चा मार्ग सुकर होण्यासाठी ३० जानेवारीला मनाम एकता मंच द्वारा वेध…. भविष्याचा
कार्यक्रमा मार्फत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शनपर शिबिर उदय नगर,नागपुर येथील समाजभवन, हनुमान मंदिर येथे घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हा सरचिटणीस राजेंद्रबाबु इंगले, जिल्हा संघटक डॉ. नितीन कान्हौलकर, मनाम एकता मंच जिल्हाध्यक्ष वैभव तुरक यांनी केले. तसेच विद्यार्थ्याना मुख्य मार्गदर्शनची भूमिका डॉ. प्रा.योगेश्वर राऊत सर व सुधीर कुमार सर यांनी पार पाडली.तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, सचिव श्री विनेश कावळे, मनाम युवा आघाडी अध्यक्ष राजू चिंचाळकर तर मनाम एकता मंच नागपूर तर्फे सर्वश्री नितीन पांडे, प्रवीण निंबाळकर,ओमप्रकाश इंगळे, प्रकाश उंबरकर, भूषण सावईकर, मिथुन कुंडले, सुनील येवले, स्वप्निल तळखंडे, रूपेश साबळकर, राकेश उंबरकर, संदीप फुकटकर, अमोल येऊतकर,राहुल नीबुळकर, रितेश रोहनकर, रुपालीताई राऊत, सवाईकरताई प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्रबाबु इंगळे व आभार प्रदर्शन वैभव तुरक तसेच संचालन वैभव नक्षने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र नक्षने, विवेक तळखंडे,कौस्तुभ नागपूरकर, शुभम नागपूरकर, तुषार मिराशे, प्रफुल्ल निंबाळकर स्वप्नील चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले.