आकाशवाणी नागपूरचे प्रशासनिक अधिकारी देवानंद शेंडे सेवानिवृत्त

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6718*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

196

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : नागपूरच्या आकाशवाणी केंद्रा मधील प्रशासनिक अधिकारी देवानंद शेंडे हे 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 जानेवारी 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. 7 नोव्हेंबर 1983 रोजी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात लिपिक पदावर आपली कारकीर्दने सुरुवात करताना त्यांनी मुख्य अभियंता कार्यालय मुंबई, नेशनल चैनल एसपीटी नागपूर, सिवील कन्सट्रक्शन विंग आकाशवाणी नागपूर, आकाशवाणी उस्मानाबाद दूरदर्शन केंद्र नागपूर येथे लेखापाल, प्रशासनिक अधिकारी म्हणून विविध पातळीवर काम केलेले आहे.
मुळ भंडारा येथील अड्याळचे रहीवासी असणारे शेंडे यांनी बीकॉम पदवी धारण केली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आकाशवाणी नागपूर मधील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार करुन भावपूर्ण निरोप दिला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.