विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हा संघटक सचिव म्हणून डॉ. नितीन कान्होलकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष गणपतराव चौधरी व सरचिटणीस राजेन्द्रभाऊ इंगळे यांच्या मान्यतेने तसेच न्यायाधीश श्री कडवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन कान्होलकर यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ मध्ये नागपूर जिल्हा संघटक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
महामंडळाचे ध्येय धोरण अंगिकारत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या माध्यमातून व महामंडळाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात समस्या सोडविण्याचा व समाज प्रगती करिता सर्वतोपरी प्रयत्न करेल.असे कान्होलकर यांनी सांगीतले.
या निवडीबद्दल त्यांनी महामंडळाचे वरिष्ठ बंडु राऊत,आदरणीय अंबादास पाटील, श्याम आसकरकर यांचे आभार मानले.

You missed