Home कृषिसंपदा इंडोरामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा इंडो गल्फ फर्टिलायझर्सच्या अधिग्रहणाला सीसीआयची मंजुरी

इंडोरामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा इंडो गल्फ फर्टिलायझर्सच्या अधिग्रहणाला सीसीआयची मंजुरी

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6694*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

123 views
0

नवी दिल्ली, पीआयबी : स्पर्धा कायदा 2002 च्या कलम 31(1) अंतर्गत इंडोरामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आयआयपीएल) द्वारा इंडो गल्फ फर्टिलायझर्सच्या अधिग्रहणाला भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) आज मंजुरी दिली.
प्रस्तावित संयोजन ग्रासिम इंडस्ट्रीज लि. चा खते विभाग असलेल्या इंडो गल्फ फर्टिलायझर्सच्या आयआयपीएलकडून अधिग्रहणाशी संबंधित असून स्लम्प सेलच्या आधारावर हस्तांतरित केले आहे.
आयआयपीएल मुख्यत: खत विशेषत: फॉस्फेटिक खते आणि वनस्पतींच्या पोषक तत्वांचे उत्पादन, व्यापार आणि विक्रीशी निगडित आहे.
जीआयएल ही व्हिस्कोस स्टेपल फायबर, क्लोरालकाली, खत , कापड आणि इन्सुलेटर उत्पादनाशी संबंधित आहे. तसेच सिमेंट तयार करण्यात आणि सहाय्यक कंपन्यांमार्फत आर्थिक सेवा देण्याचेही काम करते.
इंडो गल्फ फर्टिलायझर्स मुख्यत: यूरियाचे उत्पादन, व्यापार आणि विक्री, सानुकूलित खते, शेतीविषयक मार्गदर्शन , पीक संरक्षण, वनस्पती आणि मृदा आरोग्य उत्पादने आणि विशिष्ट खतांचे काम पाहते.
सीसीआयचा सविस्तर आदेश लवकरच जारी होईल