विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6680*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

269

विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : नागपूर : प्रतिनिधिी-राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात. मात्र हेच राष्ट्रध्वज दुस-या दिवशी रस्त्यावर, गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. हिंदु जनजागृती समितीद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर (१०३/२०११) सुनावणी करताना शासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार केंद्रीय व राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनीही त्या विषयीचे परिपत्रक काढले आहे. महाराष्ट्र शासनानेही राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे, हे कायदाबाह्य ठरते.
चेह-यावर लावायचे मास्क देखील राष्ट्रध्वजच्या रूपात आॅनलाईन विक्री होत आहे असेही निदर्शनास आले आहे, याबद्दल देखील जनप्रबोधन करण्यात आले.
कोरोना सारखी आपत् परिस्थिती असतानासुद्धा हिंदु जनजागृती समितीद्वारे दर वर्षी प्रमाणे या वषीर्ही राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात आली. या मोहिमे अंतर्गत मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर व मा. उपायुक्त पोलीस विशेष शाखा, नागपूर यांना निवेदने देण्यात आली. त्याद्वारे शासन व प्रशासनाला प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे अवैध उत्पादन व अवैध विक्री करणा-यांवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शाळा महाविद्यालयातून या विषयी व्याख्यान, प्रश्नमंजुषा इ. साठी अनुमती मागण्यात आली.
समितीतर्फे नागपूर येथे विविध भागातील ४५ हून अधिक शाळा व महाविद्यालयातून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा या विषयावर व्याख्यानाद्वारे विषय मांडण्यासाठी निवेदन देण्यात आली. अशा प्रयत्नातून ५००० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत विषय पोचवण्यासाठी समितीने प्रयत्न केले. आॅनलाईन चालणारे साप्ताहिक सत्संग व साप्ताहिक धर्मशिक्षण वर्ग याद्वारेही अनेक जिज्ञासू व धर्मप्रेमी नागरिकांपर्यंत विषय पोचवण्यात आला.
कठीण कोरोना काळात देखील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी म्हणून हिंदू जनजागृती समितीने खूप महत्त्वाच्या विषय हाती घेऊन हा उपक्रम राबवित आहे त्याबद्दल खूप आनंद होतो आहे.आम्ही हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू आणि त्यांच्यात राष्ट्राभिमान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्र प्रतीकाचा सन्मान करा हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे यामुळे निश्चित प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्राभिमान निर्माण होईल आणि क्रांतिकारकांनी दिलेल्या बलीदानातून प्रेरणा मिळेल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या.