
विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : नागपूर : प्रतिनिधिी-दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे दि. 30 आणि 31 जानेवारी 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे. शिक्षक भारतीच्या युट्युब चॅनलवर (ँ३३स्र२://६६६.८ङ्म४३४ुी.ूङ्मे/ू/रँ्र‘२ँं‘इँं१ं३्र) सर्वांना पाहता येणार आहे. दि . 30 जाने.2021 ला सायं.सहा वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मश्री डॉ. गणेश देवी करणार आहेत,तर सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.राजन गवास हे
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
याप्रसंगी माजी संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार, कवयित्री नीरजा, आमदार कपिल पाटील, प्रा .जयवंत पाटील, यांचा सहभाग असणार आहे.
वैश्विक शिक्षक रणजीतसिंह दिसले गुरुजी यांची मुलाखत घेतली जाणार असून मारुति शेरेकर हे या सत्राचे सूत्रसंचालन
करणार आहेत.
दि.31जाने20 21 रोजी सायं 6 वाजतासमारोप सत्राला ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रावसाहेब कसबे यांची उपस्थिती राहणार आहे.याच वेळी निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले असून संभाजी भगत, अरुण म्हात्रे, संजय गवांदे, विजया मारोतकर, अन्वर मिर्झा, कविता मोरवणकर, राम अहिवले,अमोल पाटील, चेतन पाटील, प्रज्ञा आनंदराव,ज्योती खांबे ,लाल बहादुर यादव या कवी कवयित्रींचा सहभाग आहे.कविसंमेलनाचे सूत्रसंचालन संजय शिंदे करणार आहेत.
या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विविध साहित्य स्पर्धांच्या पारितोषिक वितरणही या समारोप सत्रात करण्यात येणार आहे .आमदार श्री. कपिल पाटील आपले मनोगत सादर करणार असून
डॉ. रावसाहेब कसबे यांचे समारोपीय भाषण होणार आहे. बक्षीस वितरण आणि आभार प्रदर्शनाचे सूत्रसंचालन संजय गवांदे हे करणार आहेत.
अशी माहिती शिक्षक भारतीच्या शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष प्रा.जयवंत पाटील यांनी दिलेली आहे.

