खैरीची जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6654*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

229

विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : नागपूर : प्रतिनिधिी-शासनाच्या आदेशावरून कोरोनामुळे बंद असलेल्या शासकीय जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याचे आदेश आले असून गुरुवार 28जानेवारीला ग्राम पंचायत खैरी येथील जिल्हा परिषद शाळा शासनाच्या आदेशानुसार करण्यात आली. कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता चुमुकल्या लहान मुलांना कोरोना विषाणूचा कोणताही पादुर्भाव होऊ नये व सर्व विद्यार्थ्याचे शिक्षणाबद्दल मनोबल वाढावे या करिता ग्राम पंचायत खैरीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य गण यांनी फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाकरिता प्रेरित केले. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांचे हात सैनिटाइजर फवारून त्यांना फूल देउऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.