Home नागपूर देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6647*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

226 views
0

विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : प्रतिनिधी : नागपूर – ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ज्ञान विकास उच्च प्राथमिक शाळेमध्ये शांती नगर येथील गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी सूर्यभान शेंडे हे उपस्थित होते. प्रारंभी देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोला त्यांनी माल्यार्पण करून दीप प्रज्वलित केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे क्रांतिकारी गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या या गीतामुळे सर्वांच्या अंगात उत्साह संचारला. शाळेची मुख्याध्यापिका विद्या घोष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात कविवर्य सूर्यभान शेंडे, कृष्णाजी बोरकर, नरेंद्र खोब्रागडे, राजु बुटके, अजय नाईक, नीलिमा वारजूरकर, अतीक शेख, निखिल खोब्रागडे आदींची उपस्थिती होती. संचालन सविता मोटघरे यांनी केले तर आभार शबाना शेख यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिकांची उपस्थिती होती.