भारतवर्ष हिंदु राष्ट्र झाले तर संपूर्ण विश्वाचे कल्याण होईल ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन, संपादक, मासिक ट्रूथ यांचे कथन -हिंदी पाक्षिक सनातन प्रभातचा 21 वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6638*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

230

विदर्भ वतन न्यूज पोर्टल-नागपूर-प्रतिनिधी : हिंदु धर्म हा वैज्ञानिक चिंतनाने समृद्ध आहे. भारतात संगीत, विद्या, स्थापत्त्य, गणित आदी अनेक विषयांवर प्राचीन काळापासून संशोधन झाले आहे. तामिळनाडूमधील प्राचीन श्री वराह मंदिरात गर्भावस्थेतील विविध आकृत्या दगडावर कोरलेल्या आहेत; म्हणजे आपल्या पूर्वजांना त्या विषयाचे ज्ञान होते. असे अनेक विषयांचे ज्ञान आपल्याकडे होते. त्यामुळे आध्यात्मिक ज्ञानाने जागतिक कल्याणाला धारण करणे आणि त्याचे पोषण करणे, ही क्षमता केवळ भारतामध्येच आहे. एकदा भारतवर्ष धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र झाले, तर संपूर्ण विश्वाचे कल्याण होणार आहे, असे प्रतिपादन ट्रुथ मासिकाचे संपादक आणि बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे सहसचिव पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांनी केले. ते आॅनलाईन पार पडलेल्या हिंदी पाक्षिक सनातन प्रभातच्या २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते.
या कार्यक्रमाचा प्रारंभ हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर हिंदी ह्यपाक्षिक सनातन प्रभातच्या वर्धापनदिनाच्या अंकाचे प्रकाशन हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी आशीर्वादरूपी दिलेल्या शुभसंदेशाचे वाचनही या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमात सनातन प्रभातचे वाचक राजस्थान येथील प.पू. स्वामी संवित सोमगिरी महाराज, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा, लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यू-ट्यूब आणि फेसबूक यांच्या माध्यमांतून 26,444 लोकांनी पाहिला.
या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि सनातन प्रभातचे सहाय्यक संपादक श्री. चेतन राजहंस म्हणाले, द्रष्ट्या संतांनी 12 वर्षांपूर्वीच एक बातमीच्या निमित्ताने तिस-या महायुध्दाला चीन कारणीभूत ठरेल, असे सांगितले होते. तसेच चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला, अशी भूमिका मांडली होती. आज गलवान-लडाख प्रकरणांवरून चीन आणि भारत यांमधील तणावाची स्थिती पाहता, या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेले लव्ह जिहादच्या षड्यंत्रातून सुटका झालेल्या हिंदु युवतींचे अनुभव आणि बातम्या यांचे संदर्भ घेऊन हिंदु जनजागृती समितीने लव्ह जिहाद हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाच्या 11 भाषांत 4 लक्ष प्रती देशभरात वितरीत झाल्या. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आदी राज्यांत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा हा आम्ही त्या वेळी केलेल्या जागृतीचा परिणाम मानतो. हिंदूंवर होणा-या आघातांच्या विरोधात हिंदूंना जागृत करण्याचे काम सनातन प्रभातने केले आहे.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर पूर्व भारतातील प्रचारक पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, मंदिर सरकारीकरण कायदा, एन.सी.ई.आर.टी. पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचे विकृतीकरण, कुंभमेळ्याच्या वेळी रेल्वेकडून लावण्यात आलेले अधिभार, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगन्नाथ यात्रा स्थगित करण्याचा न्यायालयाचा आदेश या आणि यांसारख्या अनेक विषयांमध्ये समितीने लढा दिल्यामुळे हिंदूंना यश मिळाले आहे. त्यामुळे समाजही याविषयी जागृत झाला आहे.