Home नागपूर नागपूर शहराला जगातील प्रथम क्रमांकाच स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प सर्वांनी...

नागपूर शहराला जगातील प्रथम क्रमांकाच स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प सर्वांनी करावा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन -गडकरींच्या हस्ते हिंगणा टी पॉइंट ते छत्रपती चौक दरम्यान असणा-या रस्त्याचे लोकार्पण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6632*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

197 views
0

विदर्भ वतन : नागपूर : प्रतिनिधि : नागपूर शहरात विविध यंत्रणा द्वारे चालू असलेल्या विकासकामांमुळे जगातील प्रथम क्रमांकाच स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, आणि केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं. सार्जनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील हिंगणा टी पॉइंट ते छत्रपती चौक दरम्यान असणा-या रस्त्याचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि दक्षिण-पश्चिम नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके माजी आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, माजी खासदार दत्ता मेघे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
स्थानिक वर्धा रोडवरील छत्रपती चौकापासून सुरू झालेला हा सिमेंट काँक्रिटीकरणचा रस्ता शहराच्या बाह्य भागाला जोडणार असून यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून शहराच्या विविध भागात जाणे-येणे सोपे होणार आहे. 28 किलोमीटरचा हा केंद्रीय रस्ते निधीमधून (सी.आर.एफ.) 273 कोटी रुपये खर्चून तयार झालेला आहे. सिमेंट काँक्रिटीकरण असलेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यासाठी सेल्फ वॉटरिंग पाइप लावले असून अशा झाडांची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा गडकरी यांनी या क्षेत्रातील नागरिकांना तसेच मनपाच्या पदाधिका-यांना केला. अशाच प्रकारचा एक बाह्य वळण रस्ता दुस-या भागात सुद्धा 1,200 कोटी रुपयांच्या तरतुदीने पूर्ण होईल अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात नागपूरच्या दक्षिण पश्चिम या क्षेत्रामध्ये सुमारे 86 हजार कोटीची कामे केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात 1 हजार कोटी हे दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटर तसेच खेळांच्या मैदानासाठी दिलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून एमएमआरडीएद्वारे 60 खेळांची मैदाने नागपूर शहरातच तयार आहेत, त्याचा विशेष उल्लेख गडकरी यांनी यावेळी केला.
ब्रॉडगेज रेल्वेमुळे विदभार्तील जिल्हे सॅटेलाइट सिटीज म्हणून तयार होतील आणि या भागातील तरुणांना काम मिळेल अशी माहिती त्यांनी ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाविषयी बोलताना दिली.नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानाची निविदा प्रक्रिया पुन्हा राज्य सरकारने काढावी हे काम रखडू नये अशी विनंती त्यांनी राज्य शासनाला यादरम्यान केली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याची संस्कृती गडकरी यांनी देशात आणि नागपुरात आणली असं यावेळी नमूद केलं. सदर सिमेंट काँक्रीटचा रोड यावरील वृक्षारोपणामुळे ग्रीन रोड सुद्धा होत आहे असे त्यांनी सांगितलं. जगातील सर्व चांगल्या तंत्रज्ञानाचं नावीण्यपूर्ण नमुना आधी नागपुरात आणला जातो याचा उल्लेख करून त्यांनी नागपूरातील वर्धा रोडवरील डबल-डेकर फ्लायओव्हर त्याचेच उदाहरण असल्याच सांगितलं. अशा प्रकारचे डबल-डेकर फ्लायओव्हर हे मुंबईस्थित वेस्टन एक्सप्रेसवे वर असल्यास वाहतुकीची कोंडी कमी होऊ शकेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था नागपुरात येत आहे त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. नागपूरचा सर्वांगीण विकास होत आहे. दक्षिण पश्चिम नागपुरातील या त्यांच्या मतदारसंघात हे काम केल्याबद्दल त्यांनी गडकरींचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सतिश अंभोरे यांनी हिंगणा टी पॉइंट ते छत्रपती चौक या सहापदरी रस्त्यासोबत काटोल रिंगरोडचही काम येत्या 5 महिन्यात पुर्ण होईल असे सांगितल.