Home नागपूर विकासकार्य पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री यांनी दिले आश्वासन -भाजपा पदाधिका-यांनी दिले निवेदन

विकासकार्य पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री यांनी दिले आश्वासन -भाजपा पदाधिका-यांनी दिले निवेदन

0
विकासकार्य पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री यांनी दिले आश्वासन -भाजपा पदाधिका-यांनी दिले निवेदन

विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : नागपूर प्रतिनिधिी : 24 जानेवारी, रविवार ला राष्ट्रीय महामार्ग क्र.353 डी(नागपूर ते उमरेड)अंतर्गत नगर परिषद उमरेड हद्दीत गंगापूर ते भिवापूर नाका चौक पर्यंत रस्त्यासोबत सेवा रस्ता बांधकाम व स्ट्राम वॉटर ड्रेन बांधकाम आणि भिवापूर नाका ते रानबोडी पुनर्वसन येथपर्यंत रोड रुंदीकरणाचे काम,रस्ता डिव्हायडर वर स्ट्रीट लाईट,बायपास चौकाजवळ बस स्टॅन्ड, स्वच्छतागृह आणि बायपास ते गिरड रोडवर ओमनगर पर्यंत सर्विस रोड करण्याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. उपरोक्त कार्य लवकरात लवकर करण्याचे आयवासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले. यावेळी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे महाराष्टÑ प्रदेश उपाध्यक्ष आनंदरावजी राउत, उमरेडच्या नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, भाजपा शहर अध्यक्ष दिलीप सोनटक्के, शहर अभियंता, जगदीश पटेल, भाजपा शहर महामंत्री देवानंद गवळी उपस्थित होते.