प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मास्क विकणा-या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आदि आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा ! – सुराज्य अभियान

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6594*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

160

विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : नागपूर प्रतिनिधिी : भारतीय राष्ट्रध्वज हा कोट्यवधी भारतीयांसाठी अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी या संवेदनशील विषयी अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या इ-कॉमर्स संकेतस्थळांवरून 26 जानेवारीच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असलेले मास्क बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियान उपक्रमाच्या निवेदनाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यापूवीर्ही 15 आॅगस्टच्या निमित्ताने वरील आस्थापनांनी याचप्रकारे राष्ट्रध्वजाचे रंग असलेले मास्क बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली होती. तरी हा गंभीर प्रकार असून संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
राष्ट्रध्वज हे सजावट करण्याचे माध्यम नाही. अशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणे, त्याला थुंकी लागणे, तो अस्वच्छ होणे, तसेच शेवटी वापरानंतर कच-यात टाकणे इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार आहे आणि असे करणे हा राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950, कलम 2 व 5 नुसार; तसेच राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971चे कलम 2 नुसार व बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय गुन्हा आहे. तरी शासनाने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.