ठिकठिकाणी गणराज्य दिन साजरा, राष्टÑध्वजाला दिली सलामी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6579*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

203

सी.पी.डब्लू.डी. (केंद्रीय लोकनिर्माण विभाग ) कॉलनी
विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्थानिक सेमीनरी हिल्स येथील केंद्र शासकीय कर्मचारी आवासीय परिसर असलेल्या सी.पी.डब्लू.डी. (केंद्रीय लोकनिर्माण विभाग ) कॉलनीमध्ये भारतीय खान ब्यूरोचे खान नियंत्रक पी.एन. शर्मा यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. केंद्रीय लोकनिर्माण रहीवासी कॉलनीमध्ये सकाळी आयोजित कार्यक्रमात केंद्र शासनाच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
नवीन सचिवालय भवन
प्रजासत्ताक दिनानिमित्त स्थानिक सिव्हिल लाइन्स येथील नवीन सचिवालय भवन येथे केंद्रीय जलशक्ती मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय भूजल मंडळाचे संचालक डॉ. प्रभात कुमार जैन यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले .
केंद्रीय जीएसटी भवन
स्थानिक सिव्हिल लाइन्स येथील केंद्रीय जीएसटी भवन येथे नागपूर विभागाचे जीएसटी आयुक्त भीमाशंकर यांनी ध्वजारोहण केले .प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित जीएसटी भवन येथील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात आयुक्त, उपायुक्त तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.