
विदर्भ वतन न्यूज पोर्टल-नागपूर-प्रतिनिधी : शेतावधानी शतपैलू बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र ग्रंथाचे विमोचन 17 जानेवारीला मानकापूर येथील आंबेडकर कालोनी बुद्धविहार येथे करण्यात आले.
”जगाला मानवतेचा संदेश देणा-या महान विभूतिंच्या विचारांचा पुनरुच्चार वारंवार जगापुढे न झाल्यास केवळ महापुरुषच विस्मृतीस जात नाही, तर ते विचार सुद्धा मरतात” म्हणून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहितीची आज जगाला गरज आहे. म्हणून शेतावधानी शतपैलू बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील कार्याची महत्ता व माहिती कळावी हाच मूळ उद्देश्य असल्यामुळे मी एक छोटासा प्रयास केला आहे. त्यात प्रामुख्याने प्रमुख मार्गदर्शक स्मृतीशेष प्राध्यापक डॉ. भाऊ लोखंडे तसेच देविदास घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले. या ग्रंथाच्या लोकार्पण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मा. नितीन राऊत आणि माजी आमदार प्रकाश गजभिये, उपेंद्र शेंडे, वेदप्रकाश आर्य, भोलाजी सरवर प्रख्यात कवी लेखक व साहित्यकार नरेंद्र जिचकार, नगरसेविका रश्मीताई ऊईके, साक्षी राऊत नगरसेविका, अभय राऊत आणि संपूर्ण दुफारे परिवारांसमक्ष वरील ग्रंथाचे विमोचन दि. 17 जानेवारी ला संपन्न झाले असून आंबेडकर कॉलोनी बुद्ध विहार मानकापूर येथे मोठ्या संख्येने यशस्वीरित्या पार पडले. वरील सर्व मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ देऊन जे.व्ही.दुफारे यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोला सरवर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यास अनिल मेश्राम, रितेश शिवपेठ, सुभाष मानमोडे , महेंद्र भांगे, योगेश वागदे, मनोहर दुपारे, महेंद्र दुपारे, राजू सहगल, सुबोध सरोदे, सुरेंद्र पाटील, सुधिर भगत, साई चौधरी, नंदु बेंडे यासर्वानी परिक्षम घेतले व कार्यक्रमाची शोभा वाढविली.

