Home नागपूर अखिल खेडूला कुणबी समाजा तर्फे विदर्भ स्तरीय उपवर-वधूवर परिचय स्मरणिकेचे प्रकाशन

अखिल खेडूला कुणबी समाजा तर्फे विदर्भ स्तरीय उपवर-वधूवर परिचय स्मरणिकेचे प्रकाशन

0
अखिल खेडूला कुणबी समाजा तर्फे विदर्भ स्तरीय उपवर-वधूवर परिचय स्मरणिकेचे प्रकाशन

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : अखिल खेडुला कुणबी समाजाच्या वतीने जानेवारी 2021मध्ये,कार्यकारिणीच्या बैठकीत विदर्भ स्तरीय उपवर वर-वधु परिचय स्मर्णिका विमोचन करण्याचे निर्णय कमेटीच्या वतीने घेण्यात आला आहे. त्याकरिता संपूर्ण खेडूले कुणबी समाज बंधू आणि भगिनींना कळविण्यात येत आहे की, आपल्या परिवारांतील किंवा आपल्या नातेवाईकांकडे विवाहोत्सुक उपवर मुले आणि मुलीं असतील तर, त्यांचे परिचय पत्र समाजाच्या कार्यालयात येवून तसेच पदाधिका-याशी संपर्क साधून समाजाकडे असलेल्या विहीत नमुन्यातील फार्म मध्ये उपवर मुला, मुलींची माहीती भरून सोबत दोन ( 2 ) पासपोर्ट फोटो 31 जानेवारी 2021 पर्यंत अखिल खेडूला कुणबी समाजभवन प्लॉट नं.1146 आशिर्वाद नगर, रिंगरोड नागपूर येथे आणून देण्याची कृपा करावी. उपवर मुला मुलींची फोटोसह माहीती स्मरणीकेत प्रकाशित करण्यात येईल. तरी सर्व समाज बांधवांनी आपल्या उपवर मुला मुलींची माहीती देण्याची कृपा करावी. असे आवाहन अध्यक्ष प्रभाकरराव पिलारे यांनी केले आहे. संपर्काकरिता कार्यालय क्र. 0712-2704627/ 09921316393 किंवा सचिव सुधाकर भर्रे (09420247618/ 09834961981) माजी सचिव राजारामजी डोनारकर (9422807369) कोषाध्यक्ष संजय बुल्ले (9421704933) सहसचिव नंदकिशोर अलोणे (8446000461) यांच्याकडे संपर्क साधता येतील.