राम जोशी यांच्या हस्ते डॉ. सूरज तेजकुमार करवाडे यांना कोविड-19 वारिअर अवॉर्डं

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6534*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

230

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : डॉ. सूरज तेजकुमार करवाडे यांना कोवीड वारियर म्हणून नागपूर महानगर पालिकेतर्फे डॉ. सूरज करवाडे यांना सन्मानीत केल्या गेले. कोविड वारिअर अवॉर्ड मंगळवार दि.१९ जानेवारीला, अ‍ॅडिशनल कमिशनर राम जोशी यांच्या हस्ते कोविड -19 वारिअर अर्वाड व मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी मेडिकल हेल्थ आॅफिसर डॉ.विजय जोशी, डॉ. सागर नायडू, डॉ. शुभम मनघटे, डॉ. प्रफुल शुध्दलवार हे सर्व उपस्थित होते. डॉ. सूरज करवाडे यांनी आरटी पीसीआर आणि एनटीजेनचे स्वॉब कलेक्शन वर काम केले आहे. आणि गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर पण आहेत . मागे त्यांनी अमेरिकन कॅन्सर सोसायटी यांचे वर्ल्ड रेकॉर्ड नागपूर मध्ये ब्रेक केले आहे. सोबतच ते डेन्टल चेकप कॅम्प करत असतात. अशी माहिती त्यांनी एका पत्रकात दिली आहे.