गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय नाव देण्याची मागणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5229*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

226

26 जानेवारी रोजी रास्ता रोको व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रालयाला गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रालय नागपुर असे नाव द्यावे, या मागणीचे सर्व आदिवासी संघटनेने जिल्हाधिकारी मार्फ़त मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
नागपूर शहराची ( नगराची ) स्थापना सुमारे ३५० वषार्पूर्वी गोंडराजे बख्त बुलंद शहा यांनी केली. नागपूर सह विदर्भातील सर्व जिल्हे हे गोंडवाना प्रदेश म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक दृष्ट्या गोंडवाना भूप्रदेशाला खूप मोठा आदिवासी सांस्कृतिक महत्व प्राप्त आहे. गोरेवाडा तलावाची निर्मिती ही गोंडवनातील महाराज यांचे काळातील होती. आदिवासी समाजाची अस्मिता या भागाशी जुळलेली आहे. म्हणून सातत्याने आदिवासी समुदायाकडून गोरेवाडा आंतर्राष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर असे नाव करण्याची मागणी शासन स्तरावर करण्यात येत होती. परंतु मंगळवार दि.१९ जानेवारी रोजी, समाजाच्या भावना लक्षात न घेता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर असे नामकरण करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. यामुळे आदिवासी समाजाच्या भावनेला धक्का पोहचला असून सरकार विरोधी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती आदिवासी समुदायाला आदर आहे मात्र त्यांचे नाव हे उद्यानाला न देता इतरत्र कुठेही दिल्यास आदिवासी समुदायाला हरकत नाही. त्याचे आम्ही स्वागत करू. मात्र आदिवासी समुदायाची अस्मिता, संस्कृती जुळलेल्या गोरेवाडा आंतर्राष्ट्रीय प्राणी उद्यानाला गोंडवाना आंतर्राष्ट्रीय प्राणी उद्यान, नागपूर असे नाव देण्यात यावे अशी मागणी नागपूरच्या मायाताई इवनाते, आकाश मडावी, दिनेश शेराम, विनोद मसराम, अरविंद गेडाम, राजेंद्र मरसकोल्हे, अश्विन गेडाम, एम.एम.आत्राम, एन. झेड. कुमरे, वीरेंद्रशहा उईके, मधुकर उइके, विलास एस. कुमरे, राजेश इरपाचे, शिवा कोकर्डे, शेखर येटी, श्याम कार्लेकर, प्रशांत वरठी, स्वाती मडावी, दीप्ति सय्याम, रवी पेंदाम, प्रमोद कौरती, बबिता धुर्वे, पोर्निमा पेंदाम, दिलीप मसराम, गीता उईके, मनोज पोतदार, मोनु धुर्वे, प्रवीण मडावी, सुशांत धुर्वे, देव मरसकोल्हे, विजय परतेकी, प्रशांत मडावी, हरीश उईके, सचिन मसराम, शिवकुमार उईके,आकाश परतेकी, आशीष मसराम, विट्ठल उईके, रोशन येडमे, सारिका वट्टी, सर्व समाजातील बांधवाच्या वतीने मागणी पूर्ण न झाल्यास समाजाच्या वतीने २६ जानेवारी २०२१ रोजी काटोल टोल नाका, गोरेवाडा रोड नागपूर येथे रस्ता रोको सह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. असे आकाश मळावी संस्थापक अध्यक्ष यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे .