Home चंद्रपूर ‘आप‘चा जिवती येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न

‘आप‘चा जिवती येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6501*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

153 views
0

विदर्भ वतन-चंद्रपूर-प्रतिनिधी : आम आदमी पार्टीने चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निवडणुका लढवायचे ठरविले आहे येणा-या नगरपंचायत, पंचायत समीती, जिल्हा पररिषदा ग्रामपंचायत निवडनुकीचे ऊद्दीष्टे समोर ठेऊन वाटचाल सुरू केली आहे. आम आदमी पार्टी चे दिल्लीचे मॉडेल जनतेसमोर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे जनतेकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आपचे संघटन मजबूत करण्याकरिता जिल्हा कमेटी तालुका कमेटी अथक प्रयत्न करीत आहे .
यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री. सुनिल देवराव मुसळे, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री.भिवराज सोनी, राजुरा विधानसभा प्रमुख प्रदीप बोबडे, तसेच फळक पदाधिकारी सूर्यकांत चांदेकर , जिवती तालुका अध्यक्ष मारूती पुरी, सचिव गोविंद गोरे, उपाध्यक्ष सुनील राठोड, हरिचंद्र जाधव युवाध्यक्ष अक्षय शेळके, युवाउपाध्यक्ष बालाजी मस्के, श्रीराम सानप तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.