Home नागपूर विठ्ठल लांजेवार यांचे निधन, अनेक संस्थांनी अर्पण केली श्रद्धांजली

विठ्ठल लांजेवार यांचे निधन, अनेक संस्थांनी अर्पण केली श्रद्धांजली

0
विठ्ठल लांजेवार यांचे निधन, अनेक संस्थांनी अर्पण केली श्रद्धांजली

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : प्रसिद्ध कवी,गझलकार,नाटककार,ललित लेखक व चरित्र लेखक विठ्ठल लांजेवार यांचे दिनांक 15 जानेवारी रोजी अकस्मात निधन झाले. सहाव्या झाडी बोली साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आरोग्य खात्यात नोकरी करूनही वाङ्मयवर त्यांचे निस्सीम प्रेम होते.एक साहित्यिक म्हणून तर ते मोठे होते पण माणूस म्हणूनही फार मोठे होते. मूळचे ते पवनी गावचे होते.संपूर्ण नोकरी त्यांची भंडारा जिल्ह्यात गेली.सेवानिवृत्तीनंतर ते नागपूर येथे स्थायिक झालेले होते. माज्याशी त्यांच्या खूप जवळ चा संबंध होता.त्यांच्या जाण्याने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नव्हे ते वैदर्भीय साहित्य वतुर्ळाची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या जाण्याने झाडीबोली साहित्य व वैदर्भीय साहित्य क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाल्याचे तीव्र भावना जाणवत आहे. विठ्ठल लांजेवार यांना विदर्भ वतन परिवार, साहित्य कला सेवा मंडळ, वैदर्भीय शब्दशिल्प परिवार, आर. के. प्रकाशन,नागपूर व नवोदित साहित्य सांस्कृतिक मंडळ व भंडारा -गोंदिया साहित्य संघटनेतर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
विठ्ठल लांजेवार यांची साहित्य संपदा : बाल कवितासंग्रह-गीतसुधा, पाऊसगाणी, गीतांचा झुला, खंडकाव्य-ऋतुकळा, काव्यसंग्रह–वेदनेची ऋचा,संदेश,माज्या मुलुकाची कता. चरित्रग्रंथ-महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, डॉ.आंबेडकर, विनोबा.वैचारिक ग्रंथ-सत्यधर्मी तुकाराम,नाटक-युगनायक इत्यादी.
त्यांची एक कविता इथे देत आहो
पायटच्या पारमंदी ,पाय कोणाचा वाजते
माय बयना जागते ,मोवा थिपते ,थिपते
माडियाच्या टोल्यावर सिंग ,तारफा वाजते
ढोल ,नंगा?्या संगाती पाय तालात ठिकते
रेला झुलते झुलते ..मोवा थिपते थिपते
पोटं घेऊन हातात पाय रान तुटवते
पेटं भुकंचा वनवा मोवासिना इझवते
लोट घामाचा वायते.. मोवा थिपते थिपते
दुक जिनगीले पुरे सुक हातातून खरे
नाच गाण्याच्या धुंदीत जीव कस्ट इसरते
वारा घामाले पुसते.. मोवा थिपते थिओटे