शेगांवचे संत गजानन महाराजांवरील “भक्तप्रतिपालक” मराठी लघुपटाचा मोठ्या उत्साहात मुहूर्त

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6487*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

239

विदर्भ वतन-नागपूर-प्रतिनिधी : श्री.संत गजानन महाराजांच्या भक्तांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभववरील आधारित आर. एम. प्रॉडक्शन आयोजीत कार्यक्रमात “भक्तप्रतिपालक” या मराठी लघुचित्रपटाचा मुहूर्त नुकताच रविवारी १० जानेवारी रोजी नाईक रोड, महाल मध्ये नाईकवाडा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. याकार्यक्रमा प्रसंगी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नागपूर शहराचे नवनिर्वाचित महापौर मा. दयाशंकर तिवारी, मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धरमपेठ झेंडा चौक येथील संत गजानन महाराज मंदिराच्या अलका कापरे, आणि मेडिकल चौक येथील नाथे पब्लिकेशनचे संजय नाथे व लाकडीपूल संत गजानन महाराजांच्या मंदिराचे अध्यक्ष दिलीप खोडे तसेच विजयराव मोरघरे यावेळी उपस्थित होते. निर्माता रेवन मंजुळे आणि डॉ. रोहित मंजुळे दिग्दर्शक आहेत. सिनेमॅग्राफी कॅमेरामन अक्षय सावरकर यांची होती. याचित्रपटात प्रमुख भूमिका करणारे कलावंत स्वप्नील भोंगाडे, या मराठी लघुचित्रपटात मेन रोलमध्ये मंजिरी नावाची विशाखा पवार हिने प्रमुख भूमिका केली. हर्षलता नाईक हिने आईची भूमिका निभवली. आणि स्वरूपा नाईक हिने मेघाचा रोल केलेला आहे. याशिवाय अक्षय सावरकर, अंबिका निकम, अक्षय दुधनकर, चैतन्य हांडे, मिनल थापे आणि अजय दिवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अवघ्या ३ दिवसात मराठी लघु चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. श्री.संत गजानन महाराजांच्या भक्तीवर करण्यात आलेला हा मराठी लघुचित्रपट नक्कीच आवडेल असा विश्वास दिग्दर्शक आणि निमार्ता यांनी व्यक्त केला आहे. यामराठी लघूचित्रपटा साठी सर्वच कार्य करणारे व्यक्तींनी परिश्रम घेतले.