Home Breaking News कळमना येथे श्रमदानातून वनराई बंधारा

कळमना येथे श्रमदानातून वनराई बंधारा

101 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल,नागपूर – कृषी विभाग व ग्रामपंचायत कळमना ता. नागपूरचेवतीने येथील गावकऱ्यांचे व शासकीय कर्मचाऱ्यांचेवतीने श्रमदानातून १८ डिसेंबर २०२० रोजी वनराई बंधाऱ्याचे कामाला सुरुवात करण्यात आले. यावेळी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य श्री. सुभाषराव गुजरकर, सरपंच अमोल परतेकी, माजी सरपंच प्रभाकरराव आचार्य, कृषी पर्यवेक्षक एस.एन.टोंगसे, कृषी सहाय्यक वैशाली तिडके, ग्रामसेवक एस.सी.गजभिये, प्रामुख्याने उपस्थित होते.
या भागात नव्याने रुजू झालेल्या कृषी सहाय्यक उज्वला उजगावकर यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या या श्रमदानात श्री. वासुदेव मस्के, अरविंद ठाकरे, प्रकाशजी डांगे, सचिन सिंग व गावातील नागरिक यांनी श्रमदान करून गावात एक चांगला पायंडा पाडला. या वनराई बंधाऱ्यामुळे शिवारातील गुराढोरांकरिता पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरून जमिनीतील पाण्याची पातळी वाढणार आहे.