उदगीर अ. भा. बालकुमार साहित्य संस्थेचे वाड:मय पुरस्कार जाहीर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6471*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

296

पुणे येथील शिवाजी चाळक, औरंगाबाद सुनंदा गोरे व सांगली च्या वर्षा चौगुले मानकरी.
विदर्भ वतन-उदगीर-प्रतिनिधी : येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारे वाड:मयीन पुरस्कार (सन २०१९) रविवारी घोषित करण्यात आले. या पुरस्कारासाठी पुणे येथील शिवाजी चाळक, औरंगाबाद सुनंदा गोरे तर सांगली च्या वर्षा चौगुले यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पदाधिका?्यांनी दिली.
बालसाहित्याचे सदरील पुरस्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये संस्थेला जाहिर करता आले नव्हते. यासाठी संस्थेच्या पदाधिकाºयांनी रविवारी जाहीर केले. यात कै. राजकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार पुणे येथील शिवाजी चाळक यांच्या पाखरमाया या बालकविता संग्रहास, कै. लक्ष्मीबाई विठोबा केदार स्मृती पुरस्कार, औरंगाबाद येथील सुनंदा गोरे यांच्या नवी प्रतिज्ञा या बालनाट्य संग्रहाला तर कै. विजयकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार सांगली येथील वर्षा चौगुले यांच्या मैत्री या बालकथा संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५०५१ / – रू. रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. लवकरच एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रतिनिधी संजय ऐलवाड, अध्यक्ष प्रा. रामदास केदार, कार्यवाह रसूल दा. पठाण यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष दयानंद बिरादार, सहकार्यवाह अनिता यलमटे, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे, समन्वयक प्रशांत शेटे सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योती डोळे, चंद्रदीप नादरगे, चंद्रशेखर कळसे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. उदगीर येथील अ. भा. बालकुमार साहित्य संस्था स्थापनेला ३ वर्षे पूर्ण झाली असून यापूर्वी मुंबईचे एकनाथ आव्हाड, नाशिक येथील संजय वाघ सोलापूर च्या आशा पाटील व पुणे येथील संंजय ऐलवाड यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.