सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6462 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

319

मन चंचल

मन झालया चंचल
आलं त्याला उधाण
ऊनवा-याशी मिळुन
त्यानं बांधलं संधान

फिरतंय सुसाट होत
वारा पिऊनीच मन
न्हाते गुलाबी थंडीत
हासुनी बोलती जन

पिसाटलं मन आता
बनलंय त्याचंच वारं
मोकाट ह्या रानातून
झालंय फिरुनी गार

कसं आवरावं बाई
मोकळ्याच मनाला
घालू वाटतंय बांधून
थरथर त्या तनाला
-सौ.भारती सावंत
मुंबई, मो.9653445835