८ पारितोषिके पटकावित ‘हॅलो राधा मैं रेहाना’ हे नाटक राज्यात अव्वल

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6458 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

232

विदर्भ वतन-चंद्रपुर-प्रतिनिधी : ५९ व्या महाराष्ट्र राज्य हिन्दी राज्य नाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर या संस्थेच्या अजय धवने, आशिष अम्बाडे निर्मीत ‘हॅलो राधा में रेहाना’ या नाटकाने निमीर्तीच्या प्रथम पारितोषीकांसह ८ पारितोषीके पटकावित राज्यात अव्वल ठरण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या नाटकाला निमीर्तीचे प्रथम पारितोषीक प्राप्त झाले असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषीक डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांना जाहीर झाले आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रौप्यपदक नूतन धवने यांना तर अभिनय गुणवत्ता पुरस्कार रोहिणी उईके यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषीक हेमंत गुहे यांना तर सर्वोत्कृष्ट नेपथ्याचे प्रथम पारितोषीक पंकज नवघरे, तेजराज चिकटवार यांना जाहीर झाले आहे. सर्वोत्कृष्ट रंगभूषेचे प्रथम पारितोषीक मेघना शिंगरू, बबीता उईके यांना जाहीर झाले असून सर्वोत्कृष्ट नाट्य लेखनाचे प्रथम पारितोषीक या नाटकाचे लेखक निरंजन माकंर्डेयवार यांना जाहीर झाले आहे. या नाटकाने राज्यात प्रथम येत चंद्रपूरची यशोपताका पुन्हा एकदा राज्यात डौलाने फडकविली आहे.