Home नागपूर स्वामी विवेकानंद जयंती दिनी विजया मारोतकर लिखित ‘युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद’ चरित्र लेखनाचे प्रकाशन

स्वामी विवेकानंद जयंती दिनी विजया मारोतकर लिखित ‘युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद’ चरित्र लेखनाचे प्रकाशन

0
स्वामी विवेकानंद जयंती दिनी विजया मारोतकर लिखित ‘युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद’ चरित्र लेखनाचे प्रकाशन

विदर्भ वतन-नागपुर-प्रतिनिधी : युवा पिढी करिता सतत कार्यरत असणा?्या सुप्रसिद्ध लेखिका विजयाताई मारोतकर यांनी लिहिलेल्या ‘ युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद ‘ ह्या 175 पृष्ठ संख्या असलेल्या चरित्र लेखन पुस्तकाचे स्वामिजींच्या 158 व्या जयंतीदिनी अम्बाझरी नागपूरच्या रम्य परिसरात स्थित स्वामी विवेकानंद स्मारक परिसरात आयोजीत प्रकाशन समारंभात प्रकाशन व्हावे, हा एक अतिशय मोठा असा सुवर्ण योग आहे. युवा पिढी करिता त्या करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे, त्याची ही कृतिशील पावती होय “असे उदगार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.गणेश चव्हाण यांनी काढले.
सुप्रसिद्ध लेखिका विजया मारोतकर यांनी लिहिलेल्या ‘ युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ‘ या चरित्रलेखन पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा प्रसंगी ते बोलत होते.
स्वामी विवेकानंदांच्या 158 व्या जयंती दिनी स्वामी विवेकानंद स्मारक परिसर, अंबाझरी,येथे माय मराठी नक्षत्र समूहाच्या वतीने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका मा. विजयाताई ब्राह्मणकर,सुप्रसिद्ध कवी डॉ.माधव शोभणे,नागपूर आकाशवाणी केंद्राचे अधिकारी श्री.रवींद्र भुसारी , सामाजिक युवा कार्यकर्ते प्रा. नरेंद्र भुसारी, कृषी केंद्र टीव्ही केंद्राच्या संचालिका श्वेता मिश्रा ,जैन पुलक संघटनेचे अनेक पदाधिकारी हे मान्यवर उपस्थित होते.
विजयाताई ब्राह्मणकर म्हणाल्या,”विजया मारोतकर हे मराठी साहित्यातलं अतिशय लोकप्रिय असलेलं असं नाव आहे. सातत्याने लेखन करणे हा त्यांचा गुण आहे. आज त्यांनी लिहिलेले स्वामी विवेकानंद हे पुस्तक प्रकाशित होत आहे, हे नक्कीच नितांत वाचनीय असे हे पुस्तक आहे..आज युवा पिढी वाचनापासून दूर चाललेली आहे. स्वामी विवेकानंदाची सोप्या भाषेत मांडणी करुन युवा पिढी ने वाचावे असे लेखन करून एक मोठं कार्य विजया मारोतकर यांनी केलेलं आहे .मराठी साहित्यात त्यांच्या लेखनाचा फार मोठा वाचक वर्ग आहे .चरित्रलेखना मधलं हे त्यांचे बारावे पुस्तक 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद स्मारक परिसरात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी प्रकाशित व्हावे.. या सुवर्णयोगला नक्कीच स्वामी विवेकानंदांचे आशीर्वाद असावेत,असे मला वाटते .विजया मारोतकर यांच्या पुढील वाटचालीला मन:पूर्वक शुभेच्छा देते.” यावेळी नागपूर आकाशवाणी केंद्राचे अधिकारी श्रीयुत रवींद्र भुसारी म्हणाले…कि आज मराठी साहित्यातील एक महत्वपूर्ण नाव असलेल्या विजयाताई त्यांच्या समाजाभिमुख कायार्मुळे लोकप्रिय आहे.साहित्य लेखना सोबतच तरूण मुलींची आईच्या मायेन काळजी घेत मार्गदर्शन करणार्या त्या ‘विदर्भाच्या माई’ आहेत आणि त्यांच्या कायार्ची दखल घेत सावनेर येथे अफाट जनसमुदाया पुढे स्वत: आ.माई सिंधूताई सपकाल यांनी विजयाताईना ‘ विदभार्ची माई ‘ अशा सन्मानाने घोषित केलेले आहे. मी त्या क्षणाचा साक्षीदार आहो.त्यांच्या लेखनाला मी मनापासून शुभेच्छा देतो.