Home आरोग्य पिवळी नदी संघर्षनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा

पिवळी नदी संघर्षनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6422 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

105 views
0

विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल-नागपुर-प्रतिनिधी : पाइपलाइन लिकेज झाल्यामुळे मागील ८-१० दिवसापासून पिवळी नदी संघर्षनगर परिसरात निरंतर दूषित पिण्याचे पाणी येत आहे. अनेकदा आसीनगर झोनला या संदर्भात तक्रार देऊनही या समस्येचे निराकरण करण्यात आलेले नाही. परिणामस्वरूप या परिसरातील नागरिकांचे आरोग्य दूषित पेयजलामुळे धोक्यात आले आहे. भारतीय संविधानानुसार राईट टू सेफ वॉटर हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांना स्वच्छ जलापूर्ति करने ही शासनाची जवाबदारी असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या समस्येचे निराकरण जर वेळीच करण्यात आले नाही तर परिसरात रोगराई पसरू शकते. शासनाच्या निष्काळजीपणामुळे दूषित पाण्यामुळे होणा-या मृत्युची जवाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात सांगीतले आहे. जो पर्यंत या परिसरातील पाईपलाईनची दुरुस्ती होत नाही तो पर्यंत टैेंरने पाणी पुरवठा करण्याची मागणसुद्धा पिवळी नदी, संघर्षनगरच्या नागरिकांनी आसीनगर झोन कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.