क्रांतिज्योती सावित्रीबाई स्त्री मुक्तीच्या उद्गात्या : बानायत

222

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतज्योती सावित्रीबाई फुले केवळ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या नसून, संपूर्ण जगातील स्त्रीमुक्तीच्या उद्गात्या आहेत. वर्तमान काळात स्त्रियांची खरी क्षमता काय आहे आणि त्या बहुउद्देशीय (मल्टीटास्कींग) कार्ये कशारीतीने पार पाडतात, या कामाचं नुसतं कौतुक न होता त्यांच्या कार्यार्ची जाणीव समाजाने ठेवावी , असे प्रतिपादन महाराष्ट्र रेशीम संचालनालयाच्या संचालिका श्रीमती भाग्यश्री बानायत (भा.प्र.से.) यांनी केले. स्थानिक रवीनगर शासकीय वसाहतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन येथे ‘असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव एम्प्लॉइज इंडिया ‘ (एपीईआय) या संघटनेतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीच्या अनुंषगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यश्री बानायत बोलत होत्या. याप्रसंगी वन विभागाच्या मानव संसाधन, व्यवस्थापन विभागाच्या उपवन सरंक्षक, श्रीमती श्रीलक्ष्मी (भा. व. से.), विभागीय वनाधिकारी गीता ननावरे, अ‍ॅड. स्मिता कांबळे, मुंबई उच्च न्यायालय, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
सावित्रीबाईंच्या जन्मदिनी स्त्री सक्षमतेचा नवा दृष्टीकोन पुढे आणला पाहिजे हीच त्यांना त्यांच्या जयंतीदिनी वाहलेली खरी आदरांजली राहील. ‘पे बॅक टू सोसायटी’ चा निर्धार सर्वांनी करून समाजाला सक्षम करत राहू, असे मत भाग्यश्री बानायत यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कोविड योध्यांना ‘सावित्रींची शूर लेक 2020 ‘ या एपीईआयतर्फे दिल्या जाणा-या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये ज्ञानदीप असोसिएशनच्या संचालिका भावना जनबंधू, भावना वानखेडे ‘बेटिया’ फाऊंडेशनच्या शुभांगी नांदेकर, वंदना रायबोले, समता सैनिक, अ‍ॅड. स्मिता कांबळे, सुषमा कांबळे यांचा समावेश होता. पुरस्काराच स्वरुप रोख 1 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अस होते. यावेळी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन वर्षा सोनसकर, प्रास्ताविक वंदना रायबोले तर आभार ज्योती लभाने यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिमा पथाडे, शिल्पा वावरे, शिल्पा फुलझेले, मीनाक्षी कडू, मोहन गजभिये, संतोष वानखडे ,पी. डी. नागदिवे, उमेश पाटील आणि असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव एम्प्लॉइज इंडियाच्या नागपूर शाखेच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.