Home नागपूर अनुपमा उजगरे लिखित मराठी व इंग्रजी भाषेतील ‘ज्योतिबा-एक महात्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन

अनुपमा उजगरे लिखित मराठी व इंग्रजी भाषेतील ‘ज्योतिबा-एक महात्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
अनुपमा उजगरे लिखित मराठी व इंग्रजी भाषेतील ‘ज्योतिबा-एक महात्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन

अनुपमा उजगरे लिखित मराठी व इंग्रजी भाषेतील ‘ज्योतिबा-एक महात्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन क्रांतिज्योती सावित्रीबाईफुले यांच्या जयंतीदिनी मा. न्यायाधीश किशोर रोही व हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
दीनबंधु सेवा संस्था व मित्र परिवार द्वारा आयोजित प्रकाश सोहळ्यात माजी मंत्री अनीस अहमद, किशोर गजभिये, नागेश चौधरी, महाकवी सुधाकर गायधनी, प्रभाकर पावडे, गिरीश पांडव, किशोर कन्हेरे, ज्ञानेश्वर गोरे, ज्ञानेश्वर रक्षक हे मान्यवर उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे डॉ. अनुपमा उजगरे लिखित ज्योतिबा : एक महात्मा हे पुस्तक लहान मुलांना प्रेरणायी असे राहील, असे उद्गार न्यायाधीश किशोर रोही यांनी केले. सावित्रीबाई फुलेंच्या आदर्शाने स्त्रीला भारताच्या मुख्य प्रवाहात आणयासाठी मोलाची कामगिरी केली आहे तसेच स्त्री शिक्षणाकरिता त्यांनी राजमार्ग खुला केला असे प्रतिपादन किशोर गजभिये यांनी केले. यावेळी महाकवी सुधाकर गायधनी, नागेश चौधरी, हर्षदीप कांबळे व इतर अतिथिंनी या पुस्तकावर भाष्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वीणा राऊत यांनी केले. प्रास्ताविक नितीन सरदार यांनी केले. अभिजित परागे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात संजय नाथे, अविनाश निमकर, संजय केवट, दीपक वाघ, प्रा. विठ्ठल बारसे, प्रा. भाऊ दायदार,भारवाड समाजाचे नेते जोगरामजी, दीनानाथ वाघमारे आदि उपस्थित होते.